Tuesday, April 21, 2026
Homeखानदेशपत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रम

पत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात येणार असून दर्पणकार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच नागपूर येथील माहिती व जनसंपर्क संचालक डॉ. गणेश मुळे यांचे प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील राहणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ आमदार राजू मामा भोळे  आमदार  अमोल पाटील, निलेश मदाणे जनसंपर्क अधिकारी सचिवालय मुंबई उद्योजक. रजनीकांत कोठारी के.के.उद्योग  ज्ञानदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला  जिल्हा पत्रकार संघाचे माजी सर्व अध्यक्ष व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा गौरव मान्यवराचे हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यानदि. ६ जानेवारी  रोजी सकाळी १० वाजेला सर्व साधारण सभा घेण्यात येणार आहे.

पत्रकार दिना निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हातील सर्व पत्रकार बाधवानी उपस्थिती द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या