Sunday, June 15, 2025
Homeक्राईमनिसर्गाचा चमत्कार ! पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि चीनला भूकंपाचे धक्के !

निसर्गाचा चमत्कार ! पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि चीनला भूकंपाचे धक्के !

निसर्गाचा चमत्कार ! पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि चीनला भूकंपाचे धक्के !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव कायम असताना आणि  पाकिस्तानला साथ देणारा  तुर्की आणि चीन या देशांना भूकंपाचे हादरे बसले असून आशियाई देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. शुक्रवारी (१३ मे) पहाटे चीनच्या काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याचदरम्यान तुर्की आणि अफगाणिस्तानलाही भूकंपाचा अनुभव आला असून, सलग भूकंपाच्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चीनमध्ये पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने या धक्क्यांमुळे जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, तुर्कीमध्ये गुरुवारी सायंकाळी ५.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या धक्क्यामुळे इमारती हलल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. अद्यापपर्यंत कोणतीही मोठी जीवित वा मालहानी झाल्याचे वृत्त नाही.

या दोन भूकंपांच्या मधल्या काळात अफगाणिस्तानमध्ये देखील १२.४७ वाजता भूकंप झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. या भागात भूकंप ही वारंवार होणारी नैसर्गिक घटना असली तरी सलग अशा प्रकारचे हादरे नव्याने चिंतेची बाब ठरत आहेत.

भूकंप आणि जागतिक राजकारणाची पार्श्वभूमी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी देखील पाकिस्तानातील बलुचिस्तान भागात भूकंप झाल्याचा अनुभव आहे. भारताने हवेतून कारवाई केल्यानंतर पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठवणुकीच्या परिसराजवळील भागात भूकंप झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्या भूकंपाचा हल्ल्याशी थेट संबंध असल्याचे कोणतेही वैज्ञानिक किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्पष्ट वक्तव्य अद्याप आलेले नाही.

२०२३ मध्ये तुर्कीमध्ये घडलेला ७.८ रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्या दुर्घटनेत ५३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर लाखो इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. या संकटकाळात भारताने तातडीने मदत पाठवून मानवतेचा हात दिला होता.

सद्यस्थितीत चीन, तुर्की आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या