Saturday, June 14, 2025
Homeखानदेशजळगावात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन; रुग्णांना स्थानिक पातळीवर मदत

जळगावात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन; रुग्णांना स्थानिक पातळीवर मदत

जळगावात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन; रुग्णांना स्थानिक पातळीवर मदत

जळगाव, : आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

.मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय जारी झाला होता. तसेच, २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्हास्तरीय कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.पूर्वी त्रासातून मुक्तता मिळावी, यासाठी जिल्हास्तरावर कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी आणि पाठपुरावा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कक्षाच्या प्रमुख जबाबदाऱ्या:रुग्णांना अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन आणि तक्रार निवारण.अर्जांच्या प्रगतीची माहिती आणि रुग्णालयांना भेटी.कक्षाच्या कार्याबद्दल जनजागृती आणि निधीसाठी देणगी वाढवण्यावर भर.पात्र आजारांचे पुनर्विलोकन आणि आपत्तीग्रस्त भागात मदतीचे नियोजन.रुग्णांसाठी लाभ:सुलभ अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची यादी.संलग्न रुग्णालयांची माहिती आणि मंत्रालयीन दौऱ्याची गरज नाही.

अर्जाच्या स्थितीची स्थानिक पातळीवर माहिती.राज्यस्तरीय कक्ष प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची नियुक्ती झाली आहे. या कक्षामुळे रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी मदत मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या