Saturday, June 14, 2025
Homeक्राईमधक्कादायक : ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी सहा किलो चांदीसह रोकड लांबविली

धक्कादायक : ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी सहा किलो चांदीसह रोकड लांबविली

धक्कादायक : ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी सहा किलो चांदीसह रोकड लांबविली

भडगाव – प्रतिनिधी

भडगाव शहरातील घोडके सराफ या ज्वेलर्स दुकानाच्या मागील बाजूला असणारी भिंत फोडून आत प्रावेश करीत चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे

मेन रोडवरील घोडके सराफ हे दुकान मालक बाहेर गावी गेल्याने दोन दिवसांपासून बंद होते. या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्यांनी तोडून दुकानाच्या मध्ये प्रवेश करत चोरी केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

याबाबत भडगाव शहरातील मेन रस्त्यावर चे हे दुकान असून याबाबत भडगाव पोलीस निरीक्षक यांचा चोरट्यांमध्ये असलेला धाक संपलेला दिसत असून रात्री अपरात्री गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू माफियांचा सर्रास उपसा सुरु असताना आता भुरट्या चोरट्यांमध्ये पोलीस यंत्रणेचा धाक संपलेला दिसत असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या