Friday, June 13, 2025
HomeBlogड्रोन हल्ल्यानंतर युक्रेनचे जोरदार प्रत्युत्तर ; हल्ल्यात ११००रशियन सैनिकांचा केला खात्मा

ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेनचे जोरदार प्रत्युत्तर ; हल्ल्यात ११००रशियन सैनिकांचा केला खात्मा

ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेनचे जोरदार प्रत्युत्तर ; हल्ल्यात ११००रशियन सैनिकांचा केला खात्मा

कीव / इस्तंबूल (४ जून) – रशियावर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनच्या जनरल स्टाफच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत युक्रेनने ११०० रशियन सैनिकांचा खात्मा केला आहे. बहुतेक सैनिक कुर्क आणि सुमी भागात मारले गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘द कीव्ह इंडिपेंडेंट’ या माध्यमाच्या अहवालानुसार, युक्रेनने रशियाचे एकूण सुमारे ९,९०,८०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या या कारवाईत १२ रशियन लढाऊ विमाने आणि ७ टँक नष्ट केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. आतापर्यंत युक्रेनने एकूण ३८४ विमाने पाडल्याचा दावा करत आहे.

दुसरीकडे, रशियाच्या हल्ल्यांत ७ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, युक्रेनने आपल्या मृत किंवा जखमी सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.

दरम्यान, २ जून रोजी इस्तंबूल (तुर्की) येथे शांतता करारासाठी रशिया आणि युक्रेन यांच्यात बैठक झाली होती. मात्र, युक्रेनने रशियाच्या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर दोन्ही देशांमधील हल्ल्यांना अधिक वेग आला आहे.

सैनिकी टकरावाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाकडून मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांमध्ये युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्या