Sunday, June 15, 2025
Homeक्राईमजळगावात घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना अटक; २० ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त

जळगावात घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना अटक; २० ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त

जळगावात घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना अटक; २० ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

जळगाव, प्रतिनिधी शहरातील रामनगर परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या  कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून २० ग्रॅम सोने हस्तगत केले असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात  यश मिळाले आहे.

रामनगर येथील ऋषीकेश दिलीप येवले यांच्या घरात १५ ते १७ मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या चोरल्या होत्या. या घटनेनंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवताच, हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक (रा. उमर कॉलनी, जळगाव) याने केल्याचे उघड झाले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी १ एप्रिल रोजी उमर कॉलनीतून अबरारला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने आपला साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम (रा. अली मशीद समोर, हुडको पिंप्राळा, जळगाव) याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ समीरलाही अटक केली. या कारवाईत २० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, दोन्ही आरोपींना रामानंद नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहायक फौजदार राजेश मेढे, रवि नरवाडे, अतुल वंजारी, पोलीस हवालदार प्रविण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील आणि चालक प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.अटक करण्यात आलेला अबरार उर्फ चिरक्या हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या