Friday, June 20, 2025
Homeक्राईमजळगावमध्ये मेहरुण बगीच्यात मोठी कारवाई

जळगावमध्ये मेहरुण बगीच्यात मोठी कारवाई

जळगावमध्ये मेहरुण बगीच्यात मोठी कारवाई 

९.५ किलो गांजासह आरोपी गजाआड

जळगाव – शहरातील मेहरुण बगीचा परिसरात एका इसमाकडून गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ९ किलो ५२२ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुकेश बिष्णु अभंगे (वय ४३, रा. कंजरवाडा, तांबापूर, जळगाव) हा मेहरुण बगीचा परिसरात गांजाची विक्री करत असल्याचे समजले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडून ९ किलो ५२२ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि अन्य साहित्य असा १ लाख ७ हजार १३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हा दाखल,

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, पोलीस हवालदार चेतन पाटील तपास करत आहेत.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोना प्रदीप चौधरी, पोना योगेश बारी, पोका नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे यांचा समावेश होता.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

गांजासारख्या अंमली पदार्थांचा समाजावर घातक परिणाम होत असून, अशा प्रकारची कुठलीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ताज्या बातम्या