Friday, June 20, 2025
Homeखानदेशगिरीश भाऊंना डोक्याला दुखापत, रक्तस्त्राव तरीही वीर जवानाला अखेरचा सलाम !

गिरीश भाऊंना डोक्याला दुखापत, रक्तस्त्राव तरीही वीर जवानाला अखेरचा सलाम !

गिरीश भाऊंना डोक्याला दुखापत, रक्तस्त्राव तरीही वीर जवानाला अखेरचा सलाम !

 पायी चालत वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण, कुटुंबीयांचे सांत्वन करून मगच झाले नाशिकला रवाना

वरणगाव : देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज वरणगावात दाखल झाले. मात्र, जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी जात असताना लष्कराच्या ट्रॅकवरील लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला जोरात लागून त्यांना गंभीर दुखापत झाली.

डोक्यातून रक्त वाहत असतानाही मंत्री गिरीश महाजन  यांनी आपले कर्तव्य सोडले नाही. त्यांनी वीर जवान अर्जुन बावस्कर यांना पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. रक्तस्राव वाढत असल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी आणि शेख आखलाक यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

उपचारानंतरही महाजन थांबले नाहीत. त्यांनी जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. “देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. राज्य सरकार या दुःखात तुमच्यासोबत आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

दुखापतीनंतरही त्यांचा देशप्रेमाचा उत्साह कमी झाला नाही. ते अंत्ययात्रेत सामील झाले आणि तिरंगा सर्कलपर्यंत पायी चालत वीर जवानाला अखेरचा सलाम ठोकला. त्यानंतर महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना तातडीने नाशिकला रवाना व्हावे लागले.

ताज्या बातम्या