गांजा विक्री करण्यापूर्वीच परप्रांतीय तरुण जेरबंद
एलसीबीसह चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या
जळगाव : चोपडा येथून दुचाकीवरुन आलेल्या अमित दिलीप बरडे (वय ३२, रा. दोंदवाडे जोगवाडा, ता. नेवाली, जि. बडवाणी मध्यप्रदेश) या संशयिताच्या गांजा विक्र करण्यापुर्वीच एलसीबीसह चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या त्याच्याकडून २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ते धरणगाव रस्त्यावरील निमगव्हाण येथे एक संशयित गांजा विक्री करणार असल्यार्च माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कावेर कमलाकर, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, अनिल जाधव, दीपक माळी, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चवरे यांच्यासह राजू महाजन, श्रीकांत गांगुर्डे, महेंद्र भिल, रावसाहेब पाटील, मनेश गावीत, निलेश पाटील, विठ्ठल पाटील, चेतन महाजन यांच्या पथकाने निमगव्हाण गावाजवळ सापळा रचून कारवाई केली.