Friday, June 13, 2025
Homeताज्या बातम्याएनआयएफ ग्लोबल जळगाव, संगीता अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ‘इंटेरियर डिझाईन एक्सलन्स अवॉर्ड

एनआयएफ ग्लोबल जळगाव, संगीता अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ‘इंटेरियर डिझाईन एक्सलन्स अवॉर्ड

एनआयएफ ग्लोबल जळगाव, संगीता अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ‘इंटेरियर डिझाईन एक्सलन्स अवॉर्ड’

मुंबईत सुप्रसिद्ध गौरी खान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य कौशल्य विकास संस्था एनआयएफ ग्लोबल जळगाव (संगीता अकॅडमी) च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवत ‘इंटेरियर डिझाईन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ पटकावला आहे. मुंबई येथे २१ मे रोजी पार पडलेल्या भव्य पुरस्कार समारंभात, हा पुरस्कार सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर गौरी खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराने सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक प्रमोद जैन, रिया सुनील चौथवे, निशांत सुनील कुमार चवराई, तनमय अशोक बेलोकार आणि विवेक संजय दांडगे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांना उद्योग क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळाल्याने, त्यांना इंटर्नशिप्स, थेट प्रोजेक्ट्स आणि करिअर संधींचा लाभ झाला आहे.

गौरी खान यांच्यासह मनीष मल्होत्रा, ट्विंकल खन्ना आणि अॅशली रिबेलो हे नामांकित व्यक्तिमत्त्वे संस्थेचे सेलिब्रिटी मार्गदर्शक असून, ते मास्टरक्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक तयार करत आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रा. सेदुलक्ष्मी मलबारि, पुरभी फासे, तेजस्विनी कांबळे यांच्यासह अनेक अनुभवी आर्किटेक्ट्स, सिव्हिल इंजिनिअर्स आणि इंडस्ट्री तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते.

एनआयएफ ग्लोबल जळगाव ही संस्था माधवी स्किल युनिव्हर्सिटी (एमएसयु) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्या सहकार्याने डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम राबवते. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020), वर्क इंटिग्रेटेड स्किल एज्युकेशन (WIL), एनएसक्यूएफ आणि राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क (NCRF) नुसार डिझाईन केलेले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाची मान्यता लाभलेली आहे.

या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सिद्धांतज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभव, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स आणि प्लेसमेंटच्या संधी दिल्या जातात. संपूर्ण उद्योगजगतात आवश्यक असलेली कौशल्ये आणि आत्मविश्वास देणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे संचालिका सौ. संगीता पाटील यांनी सांगितले.

“गेल्या २० वर्षांपासून आम्ही गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख शिक्षण देत आहोत. आमचे विद्यार्थी आज देशभरातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत, काहींनी स्वतःचा व्यवसाय उभारला आहे, तर काहींनी स्वतःचे ब्रँड यशस्वीरित्या स्थापन केले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

 

ताज्या बातम्या