Friday, June 13, 2025
Homeक्राईमआक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार 

आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार 

 आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार 

एमआयडीसी पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी

सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका २३ वर्षीय  तरुणीवर वारंवार जबरदस्ती करून तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट २०२४ ते मे २०२५ या कालावधीत सुरू असलेल्या या प्रकारात विश्वजित विठ्ठलसिंग सिसोदे (२७, रा. बोरजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्कार, धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी जामनेर तालुक्यातील असून शिक्षणासाठी दुसऱ्या तालुक्यात वास्तव्यास आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये तिची इंस्टाग्रामवरून सिसोदे याच्याशी ओळख झाली. सोशल मीडियावरील संवादानंतर त्याने तरुणीला एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. भेटीदरम्यान फोटो आणि व्हिडीओ काढून त्याने त्या माध्यमातून तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.

फोटो आणि चॅटींग कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतरही धमक्यांचा सिलसिला सुरूच राहिला. त्याने अत्याचाराचे व्हिडीओ तिच्या वडिलांसह नातेवाईकांना पाठवण्याची तसेच वडिलांना सोशल मीडियावरून ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडितेने अखेर धाडस करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सिसोदेविरुद्ध बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

ताज्या बातम्या