Sunday, June 15, 2025
Homeक्राईमअमळनेरात  तरुणीची आत्महत्या: लग्नाच्या पूर्वसंध्येला घडली दुर्दैवी घटना

अमळनेरात  तरुणीची आत्महत्या: लग्नाच्या पूर्वसंध्येला घडली दुर्दैवी घटना

अमळनेरात  तरुणीची आत्महत्या: लग्नाच्या पूर्वसंध्येला घडली दुर्दैवी घटना

अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहरातील सानेनगर येथील दीपाली सुभाष पाटील (वय २२) या तरुणीने १५ मे २०२५ रोजी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.दीपाली ही आई-वडिलांसह राहत होती आणि तिचा विवाह १७ मे रोजी गडखांब येथील तरुणाशी ठरला होता. १४ मे रोजी रात्री तिच्या घरी मेहंदीचा समारंभ आणि गीतांचा कार्यक्रम झाला, ज्यात दीपालीने उत्साहाने नृत्यही केले.

मात्र, भल्या पहाटे तिच्या आईला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेने कुटुंबीय आणि नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला, तर लग्नाच्या तयारीत असलेल्या घरात शोककळा पसरली.दीपालीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करत आहेत

ताज्या बातम्या